*कोणतीही जीवितहानी नाही
उधमपूर –
जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात शुक्रवारी बेनी संगमावरील पादचारी पूल कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ४० जण जखमी झाले. यात अनेक मुलांचा समावेश आहे. बैसाखी उत्सवादरम्यान चेनानी भागातील बैन गावात ही घटना घडली.
पुलावर नागरिकांची गर्दी असल्याने अधिक वजनामुळे पूल कोसळला, असे जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी सांगितले. या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. पोलीस आणि मदत पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. या अपघातातील जखमींना जम्मू- काश्मीरमधील चेनानी आणि चार जणांना उधमपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.