जपानी अमेरिकन कंपन्यांची शिपरॉकेट कंपनीत गुंतवणूक

नवी दिल्ली – जपानच्या एमयुएफजी म्हणजेच मित्सुबिशी युएफजे फायनन्शियल ग्रुप आणि अमेरिकेतील कॉन्ग्लोमेराटे कोच ग्रुप यांनी भारतातील शिपरॉकेट कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे.शिपरॉकेट ही २२० देशांमध्ये कुरिअर सेवा आहे. या कंपनीतील गुंतवणुकीसाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोगाची परवानगी आवश्यक असते. एमयुएफजी बँक ही भारतातील बँकींग क्षेत्रात कार्य करत असून त्यांना शिपरॉकेट मध्ये गुंतवणूक करायची आहे. अमेरिकेतील कोच ग्रुपनेही त्यांच्या केडीटी व्हेंचर या कंपनीच्या माध्यमातून या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी अर्ज केला आहे. केडीटी व्हेंचर ही कंपनी अमेरिकेतील अर्थपुरवठा करणारी कंपनी असून ती अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांना परवानगी मिळाल्यानंतर ते शिपरॉकेट कंपनीच्या शेअर माध्यमातून गुंतवणूक करु शकतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top