टोकिओ –
शाळेत न जाताही वर्गात शिकवला जाणारा अभ्यासक्रम शिकण्यासाठी जपानमध्ये एक भन्नाट प्रयोग करण्यात येत आहे. इथे लवकरच विद्यार्थ्यांना असा पर्याय दिला जाणार आहे की, विद्यार्थ्यांऐवजी शाळेमध्ये रोबोट हजेरी लावेल आणि विद्यार्थी घरबसल्या शाळेत काय शिकवले जाते, याची माहिती मिळवू शकतील.
जपानमधील कुमामोटो शहरातील एका शाळेने विद्यार्थी गैरहजर असताना त्यांच्या जागी रोबोट वापरण्याची योजना आखली आहे. रोबोटच्या मदतीने शाळेत गैरहजर राहाणारे विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करू शकतील. मायक्रोफोन, स्पीकर्स आणि कॅमेरा असलेले हे रोबोट आणि विद्यार्थी एकमेकांसह संवाद साधू शकतात. विद्यार्थ्यांना तीन फूट लांब रोबोट शाळेच्या मैदानातही घेऊन जाता येणार आहे. टॅब्लेटच्या मदतीने विद्यार्थी रोबोट नियंत्रित करू शकतील. या रोबोटमध्ये स्पीकर असून, त्याच्या मदतीने विद्यार्थी घरून जे काही बोलेल ते ऑडिओच्या माध्यमातून वर्गात सादर करेल. नुकताच या रोबोटचा यशस्वी प्रयोगही शाळेत करण्यात आला आहे. आता नोव्हेंबरमध्ये वर्गात रोबोट उपलब्ध होतील, यासाठी नियोजन केले जात आहे.
जपानमध्ये रोबोट शाळेत जाणार विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करणार
