टोकियो – जपानमधील कामगार हे त्यांच्या भाषेतील एका म्हणीनुसार अक्षरशः मरेपर्यंत काम करत असतात. त्यांना आपल्या कामातून काही उसंत मिळावी, इतर काही कौशल्य शिकून घ्यावे त्याचप्रमाणे आपल्या कटुंबियांना अधिक वेळ देता यावा यासाठी जपानमध्ये आता आठवड्यातून केवळ ४ दिवस काम व ३ दिवसांची सुटी अशी पद्धत आणली जात आहे. कार्यपद्धतीत हा बदल करण्याचा निर्णय जपानच्या मनुष्यबळ व श्रम मंत्रालयाने घेतला आहे.जपानमधील अनेक कंपन्यांनी ही नवी कार्यपद्धती स्विकारायला सुरुवात केली आहे. यानुसार कामगारांना आठवड्यातील चार दिवस काम व तीन दिवस आराम असे धोरण आखले आहे. कामगारांना आपल्या सुटीच्या दिवसांची निवड करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साह कायम राहिल त्याचप्रमाणे ते आपल्या फावल्या वेळाचा वापर इतर गोष्टींसाठी करु शकतील. अनेक लघू व मध्यम आकाराच्या उद्योगांनी या नव्या कार्यप्रणालीचे स्वागत केले आहे. कामगारांच्या कार्यक्षमतेवरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल असेही मंत्रालयाने म्हटले आहे. काही कामगार संघटनांनी मात्र या नव्या पद्धतीनुसार वेतनात कपात होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |