Home / News / जपानचा लाकडी उपग्रह प्रक्षेपित सहा महिने अंतराळात राहणार

जपानचा लाकडी उपग्रह प्रक्षेपित सहा महिने अंतराळात राहणार

टोकियो – जपानने लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह लिग्नोसॅट प्रक्षेपित केला. हे उपग्रह ६ महिने अंतराळात राहील आणि तापमानापासून ते...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

टोकियो – जपानने लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह लिग्नोसॅट प्रक्षेपित केला. हे उपग्रह ६ महिने अंतराळात राहील आणि तापमानापासून ते वैश्विक किरणोत्सर्गापर्यंत सर्व बाबींची चाचणी करणार आहे. या उपग्रहाची रचना मॅग्नोलिया लाकडापासून बनवण्यात आली आहे.लिग्नोसेट पूर्णपणे मॅग्नोलिया लाकडापासून बनविला आहे, ते फक्त १० सेमी लांब आणि फक्त ९०० ग्रॅम वजनाचे आहे. क्योटो विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या पथकाने हा उपग्रह विकसित केले आहे. या मोहिमेमागील उद्देश हा लाकडाचा वापर करून पर्यावरणपूरक उपग्रह बनवणे आहे. या उपग्रहाच्या यशस्वी चाचणीमुळे भविष्यात अवकाशात वापरण्यासाठी लाकूड हा एक पर्याय ठरू शकतो की नाही हे संभाव्यपणे निश्चित होईल.

Web Title:
संबंधित बातम्या