मुंबई- वांद्रे पश्चिम येथील ऐतिहासिक माऊंट मेरी चर्चची वार्षिक जत्रा रविवार ८ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.त्यानिमित्ताने या चर्च परिसरात वाहतुकीचे निर्बंध लागू केले आहेत. जत्रा कालावधीत माऊंट मेरी रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी १६ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे.
जत्रेच्या काळात माऊंट मेरी रोड वाहनांसाठी बंद असला तरी कार पास दिलेली स्थानिक रहिवाशांची वाहने आणि आपत्कालीन वाहनांना याकाळात सकाळी ६ ते ११ या मार्गावरून प्रवासास परवानगी असेल. या परिसरातील प्रवासासाठी केन रोड हा पर्यायी मार्ग असेल.तर परेरा रोड हा एकमार्ग राहील. दरवर्षी माऊंट मेरी जत्रेला होणारी वाढती गर्दी लक्षात घेता वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत,असे वाहतूक अधिकार्यांनी सांगितले.