वॉशिंग्टन – जगातील सर्वात वयोवृध्द मानल्या जाणाऱ्या मारिया ब्रान्यास यांचे वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झाले. ब्रान्यास या मूळच्या स्पॅनिश असल्या तरी त्यांचा जन्म अमेरिकेत झाला होता.
ब्रान्यास यांच्या एक्स खात्यावर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. ब्रान्यास यांचे कोणत्याही वेदनेशिवाय अगदी शांतपणे गाढ झोपेत असताना निधन झाले,असे कटुंबियांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
४ मार्च १९०७ रोजी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात ब्रान्यास यांचा जन्म झाला. न्यू ऑर्लिन्समध्ये काही वर्षे राहिल्यानंतर ती लहान असतानाच तिचे कुटुंब स्पेनमध्ये परतले.मागील काही महिन्यांपासून ब्रान्यास ओलोट शहरातील नर्सिंग होममध्ये दाखल होत्या.