लंडन – जगातील सर्वात मोठा हिमनग सध्या वाहात वाहात इंग्लंडच्या दक्षिण जॉर्जिया नजीकच्या उथळ समुद्रात आला आहे. तो एका बेटाजवळ आला असून त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेल्या पेंग्विन व सिल माशांना धोका निर्माण झाला आहे.या हिमनगाचे क्षेत्रफळ लंडनच्या आकारापेक्षाही दुप्पट असून तो या ठिकाणी अडकला आहे. आता त्याचे तुकडे तुकडे होत आहेत. या क्षेत्रात मासेमारी करणाऱ्यांनीही त्या बद्दल चिंता व्यक्त केली असून या बेटावर असलेल्या पेंग्विन पक्षांनाही त्याचा धोका होऊ शकतो. अंटार्क्टिका मधील संशोधकांनी म्हटले आहे की, या हिमनगाच्या वितळण्यानंतर त्यातील पोषक द्रव्यांमुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात जीवसृष्टी वाढेल. हिमनगाच्या तुकड्यांनी या भागातील जहाजांच्या वाहतूकीलाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जगातील सर्वात मोठा आईसबर्ग इंग्लंडच्या समुद्रात आल्याने चिंता
