जंजिरा जलदुर्ग अखेर पर्यटकांसाठी खुला

मुरूड जंजिरा
पावसाळ्यात बंद असलेला मुरूडचा प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग कालपासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आल्याची माहिती मुरूड – अलिबाग पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.
पावसाळ्यात जून पासून तीन महिने जंजिरा पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवण्यात येतो.परंतु यंदा वादळी हवामान, मजुरांची कमतरता अशा अनेक अडचणी आल्याने जलदुर्गाची आतील स्वच्छता सप्टेंबर महिन्यात उशिरापर्यंत सुरू असल्याने जंजिरा खुला करण्याबाबत विलंब होत होता. त्या मुळे पर्यटकांनी मुरूडकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता. जंजिरा सुरू करावा अशी सातत्याने मागणी होत होती. जंजिऱ्य चे एकूण क्षेत्र 22 एकर असून एवढ्या मोठया क्षेत्राची स्वच्छता कमी वेळात होणे अवघड असते. किल्यात पर्यटकांचा अधिक वावर असणारे महत्त्वाचे मार्ग, रॅम्पस, आदी महत्वाची ठिकाणी स्वच्छता पूर्ण झाल्याने अखेर जंजिरापासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येत असल्याचे बजरंग येलीकर यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top