मुरुड-जंजिरा – रायगड जिल्ह्यातील मुरुड राजपुरी येथील समुद्रात असणारा ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रोज शेकडो पर्यटक ये-जा करीत असतात. याठिकाणी पर्यटकांकडून किल्ला पाहण्यासाठी प्रवेश शुल्क घेतला जात असतो. हाच प्रवेश शुल्क आज ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्याच दिवशी महिला सन्मानार्थ आबाल वृद्धांना पुर्णतः माफ करण्यात आला होता, अशी माहिती पुरातत्व विभाग अलिबाग विभागाचे सहाय्यक संवर्धक बजरंग येलीकर यांनी दिली.
किल्ले रायगड, कुलाबा आणि जंजिरा या किल्ल्यांवर गेल्यावर्षी केवळ महिलांनाच प्रवेश शुल्क आकारले गेले नव्हते परंतु यावर्षी महिलांसह पुरुषांनाही ही सवलत देण्यात आली. सध्या जंजिरा पाहण्यासाठी येणार्या राज्यातील पर्यटकांकडून २५ रुपये तर विदेशी पर्यटकांकडून ३०० रुपये घेतले जातात.
जंजिरा किल्ल्यात येणार्या पर्यटकांना प्रवेश शुल्क माफ
