मुंबई- मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी. के. रावला खंडणीच्या गुन्ह्यात पुन्हा अटक झाली आहे. त्याच्यावर एका हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई करत डी के राव आणि सहा जणांना अटक केली.
डी. के. राव हा मुंबईतील कुख्यात गँगस्टर आहे. त्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. त्याच्यावर मुंबईतील बिझनेसमन, बिल्डर्सना खंडणीसाठी धमकवल्याचा, दरोडा आणि इतर अनेक गुन्ह्यांचे आरोप आहेत. याआधी २०१७ मध्ये त्याला खंडणीच्या एका गुन्ह्यात अटक झाली होती, परंतु २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता. त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.