छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १० हजार ६८ बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र दिले आहे. संभाजीनगर शहरात २ हजार ४४८ रोहिंग्यांचे वास्तव्य आहे. तर सर्वाधिक ४ हजार ७३० बांगलादेशी नागरिक हेसिल्लोड तालुक्यात वास्तव्यास आहेत. त्यांनी जन्मदाखले मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली
किरीट सोमय्या म्हणाले की, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतातील जन्मदाखले देण्यासाठी, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि पश्चिम बंगाल सीमेवरच्या एजंटांनी एक एक षडयंत्र रचले आहे. त्या अनुषंगाने एक लाख बांगलादेशी आणि जन्मदाखल्यांसाठी विविध जिल्हाधिकाऱ्याकडे तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आले आहेत.