छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये महिनाभरात २७ हजारांवर डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळले. दिवसाला ६ हजार डेंग्यू सदृश रुग्ण आढळतात, पण महापलिकेकडे फक्त २० अहवाल येतात. त्यामुळे प्रशासनाला डेंग्यूबाबत गांभीर्य नाही असा आरोप नागरिकांनी केला.
मागच्या आठवड्यात डेंग्यूसदृश आजारामुळे दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला त्यानंतरही खासगी आणि प्रशासकीय पातळीवर याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. अनेक डॉक्टर आणि खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासण्या करून उपचार देतात. त्यामुळे खऱ्या डेंग्यूच्या रुग्णांचा आकडाच समोर येत नाही. सध्या सुरू असलेली मनपाची मोहीम फक्त अंदाजपंचे आखली आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे. तर डेंग्यूच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.