छत्रपती संभाजीनगर- आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या प्रथम समाधी दिवसानिमित्त त्यांच्या पादुका चिन्हाची स्थापना करण्याचा मान छत्रपती संभाजी नगरच्या सिडकोतील कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिराला मिळाला आहे. शेकडो भाविकांच्या साक्षीने या पादुकाचिन्हाची नुकतीच विधिवत स्थापना करण्यात आली.
छत्तीसगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी समाधी घेतली. तिथे भव्य स्मारक बनविण्यात येणार आहे. तिथेच आचार्यजींच्या १०८ चरणचिन्ह बनविण्यात आले. हे अष्टधातूंचे १०० किलो वजनाचे चरणचिन्ह संपूर्ण देशातील दिगंबर जैन मंदिरात स्थापनेसाठी पाठविण्यात येणार आहे. या पादुका चिन्ह स्थापनेचा महाराष्ट्रात पहिला मान सिडकोतील कलिकुंड पार्श्वनाथ बर सैतवाल दिगंबर जैन मंदिराला मिळाला आहे. त्यामुळे कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिर एम सिडकोचा वार्षिक यात्रा महोत्सव व आचार्य विद्यासागरजी महाराजांचा प्रथम समाधी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी मंदिरात प्रमोद डेरे यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले.