मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडनहून मुंबईत दाखल झाली आहेत. ही वाघनखे साताऱ्याला नेण्यात येतील. १९ जुलै रोजी राज्यशासनाच्या सातारा येथील संग्रहालयात ही वाघनखे प्रदर्शनाकरता ठेवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढण्यासाठी जी वाघनखे वापरली ती हीच वाघनखे आहेत असे सांगितले जात आहे. लंडनच्या संग्रहालयाने मात्र याचा इन्कार केला आहे.
लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’ मध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्य शासनाने सातत्याने प्रयत्न केले होते. या वाघनखांवरून वादही निर्माण झाला होता. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी ही वाघनखे शिवरायांची नसल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, मुनगंटीवारांनी अधिवेशनात त्यांचा हा दावा खोडून काढत ही वाघनखं शिवरायांचीच आहेत असे स्पष्ट केले होते.