पंढरपूर – कोल्हापूर येथील शाहू महाराज यांनी पंढरपूर येथील विठ्ठलास सोन्याची राखी बांधण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली. शाहू महाराज यांचे निकटवर्तीय महादेव तळेकर यांनी ही राखी काल श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे दिली. यानंतर श्री विठ्ठलास ही सोन्याची राखी बांधण्यात आली.
गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज घराण्याकडून श्री विठ्ठलास राखी बांधण्याची परंपरा आहे. रक्षाबंधन दिन व नारळी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठलास दरवर्षी सोन्याची राखी बांधली जाते.काल नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन दिनानिमित्त श्री विठ्ठलास सोन्याची राखी व अलंकार, पोशाख परिधान करण्यात आल्याने विठ्ठलाचे रुप अधिक खुलून दिसत होते. दर्शनासाठी आलेले भाविक विठूरायाच्या हातातील सोन्याची राखी पाहून समाधान व्यक्त करत होते.