रायपूर- छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात नारायणपूर-दंतेवाडा पोलिसांचे संयुक्त दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली. यामध्ये ७ नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावर पोलिसांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहेत.
माड भागातील जंगलात पोलीस गस्त घालत असताना या भागात नक्षलवादी असल्याची चाहूल लागली. त्यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरले. त्यावेळी नक्षलवादी आणि पोलिसांत चकमक झाली. त्यात ७ नक्षलवादी ठार झाले.