विजापूर – छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात दोन एसटीएफ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात ४ जवान जखमी झाले असून जखमी जवानांना हेलिकॉप्टरने रायपूरला नेण्यात आले आहे. नक्षलवाद विरोधी मोहिमेवरुन परतत असतांना तर्रेमजवळ या भुसुरुंगाचा स्फोट झाला.दरभा विभागातील काही नक्षलवादी विजापूर, सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाईसाठी तीन जिल्ह्यांतून एसटीएफ, डीआरजी, कोब्रा आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक पाठवण्यात आले. आपली शोधमोहिम आटपून परत येत असतांना हा स्फोट झाला. यामध्ये भरत साहू आणि सत्येर सिंग कांगे हे शहीद झाले असून पुरुषोत्तम नाग, कोमल यादव, सियाराम सोरी आणि संजय कुमार हे जखमी झाले आहेत.