बीजापूर – छत्तीसगडच्या बीजापूर जवळच्या जंगलात झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, आज सकाळी बीजापूरच्या मद्देड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सुरक्षा दलाबरोबर ही चकमक झाली.
आज सकाळी राखीव पोलीस दल, विशेष पथक आणि जिल्हा पोलिसांचे पथक कारवाईसाठी निघाले होते. या जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती त्यांना मिळाली. जंगलात तपास सुरु असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. त्याला प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात तीन नक्षलवादी ठार झाले. या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. पाच दिवसांपूर्वी बीजापूरमध्येच नक्षलवाद्यांनी स्फोटकांचा स्फोट करून ९ जवानांचे प्राण घेतले होते.