छगन भुजबळांना
कोरोनाची लागण

येवला – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी येवला येथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणीनंतर अहवालातून कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळून आल्यास आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून, काळजी करण्याचे कारण नाही. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी ट्विटरच्या
माध्यमातून केले.

Scroll to Top