चेन्नई विमानतळावर दुबईला जाणाऱ्या विमानामधून धूर

चेन्नई – २८० प्रवासी आणि क्रू मेंबर्स धरुन ३०० जण घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमधून उड्डाण करण्याआधी धूर येऊ लागल्याने गोंधळ उडाला. ही घटना चेन्नई विमानतळाहून दुबईला निघालेल्या विमानात घडली. उड्डाण करण्याआधी १० मिनिटे विमानाच्या इंजिनमधून धूर निघत होता. हे पाहून विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने उड्डाण करण्याआधी तांत्रिक बिघाड दिसून आल्यानं मोठा अनर्थ टळला. विमानतळ व्यवस्थापनाने तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यांनी तातडीने इंजिनमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर तब्बल अर्धा तास उशिराने विमानाने उड्डाण केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top