मुंबई- यंदा चेंबूर विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक मारण्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या प्रकाश फातर्पेकर यांचा प्रयत्न अपयशी ठरला. शिवसेना गटाचे तुकाराम यांनी फातर्पेकर यांचा दारुण पराभव केला.
शिवसेना शिंदे गटाचे तुकाराम काते यांनी १०,७११ मतांनी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रकाश फातर्पेकर यांचा पराभव केला. तुकाराम काते यांना ६३१९४ तर प्रकाश फातर्पेकर यांना ५२४८३ मते मिळाली. तुकाराम काते हे अणुशक्ती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. दहा वर्षानंतर ते पहिल्यांदाच चेंबूरमधून आमदारकी मिळविण्यासाठी आणि फातर्पेकर यांना टक्कर देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे या लढतीकडे सर्वच चेंबूरकरांचे लक्ष वेधले होते.अखेर महायुतीतील घटक पक्षांनी त्यांना साथ देऊन प्रचार केल्याने काते यशस्वी झाले.