मुंबई – चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पुलिस कर्मचारी राजेंद्र घोरपडे यांच्या विशेष कामगिरीमुळे त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.नुकताच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.
राजेंद्र घोरपडे यांची अलीकडेच गोवंडी पोलीस ठाण्यातून दुसर्यांदा चेंबूर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.घोरपडे हे आपल्या पोलीस खात्यातील कामाबरोबर सामाजिक कार्यामध्येही सहभागी होताना दिसतात. ते राहत असलेल्या चेंबूरमधील घाटले गाव परिसरात त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.त्यांच्या या विशेष कामगिरीमुळेच त्यांना ही बढती मिळाल्याचे सांगितले जात आहे. परिमंडळ – ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी राजेंद्र घोरपडे यांच्या वर्दीला स्टार लाऊन त्यांना सम्मानित करुन त्यांचे कौतुक केले आहे. घोरपडे यांच्या मित्र परिवाराने व हितचिंतकांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.