नवी दिल्ली – चॅट जिपीटीचे निर्माते व ओपन एआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येत असून आपल्या दौऱ्यात ते अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी व उद्योजकांची भेट घेणार आहेत.अल्टमन यांचा गेल्या दोन वर्षातील हा दुसरा भारत दौरा असून त्यांचा हा दौरा नेमका अशा वेळेस होत आहे जेव्हा चीनी कृत्रिम बुद्धीमत्ता कंपनीने चॅट जीपीटीचला मोठे आव्हान दिले आहे. डिपसिक या चीनी कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीने स्वस्त व वेगवान पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या व जगातील अनेक शेअर बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली होती. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चॅट जीपीटीच्या निर्मात्यांची ही भेट फारच महत्त्वाची समजली जात आहे.
चॅट जीपीटीचे संस्थापक भारताच्या दौऱ्यावर
