लंडन – ब्रिटनमधील एका कंझर्व्हेटिव्ह नेत्याने चुलत भाऊ व बहिणीच्या विवाहावर बंदी घालण्याची मागणी संसदेत केली. कंझर्वेटिव्ह खासदार रिचर्ड होल्डन यांनी हा प्रस्ताव मांडला. ब्रिटनमधील ब्रिटिश-पाकिस्तानी आणि आयरिश नागरिकात चुलत भाऊ-बहिणींमध्ये विवाहाचे प्रमाण जास्त आहे.
ऑक्सफर्ड जर्नल ऑफ लॉ अँड रिलिजन रिसर्चचा हवाला देत रिचर्ड होल्डन यांनी सांगितले की, चुलत भाऊ-बहिणीच्या विवाहातून जन्माला आलेल्या मुलांमध्ये आजार आणि अपंगत्वाचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे ब्रिटिश समाजासाठी ही प्रथा अजिबात योग्य नाही. ब्रिटनमध्ये भाऊ-बहीण, आई-वडील किंवा स्वत:च्या मुलाशी विवाहावर बंदी आहे . परंतु ब्रिटनमध्ये फर्स्ट कझन मॅरेजबाबत कोणताही कायदा नाही. होल्डन यांच्या प्रस्तावाला अनेक कंझर्व्हेटिव्ह सहकाऱ्यांनी पाठिंबा दिला. मात्र, सरकारच्या पाठिंब्याशिवाय हा कायदा मंजूर होणे शक्य नाही.