चीन अनुदानित कोळसा ऊर्जा
प्रकल्पाचा महाबोधी वृक्षाला धोका!

कोलंबो – कल्पितिया द्वीपकल्पाच्या दक्षिणेला श्रीलंकेच्या वायव्य प्रांतातील पुट्टलम येथील नोरोचोलाई येथे असलेल्या आणि चीनने वित्त पुरवठा केलेल्या कोळसा ऊर्जा प्रकल्पामुळे जगातील सर्वात जुन्या असलेल्या ऐतिहासिक महाबोधी वृक्षाला धोका निर्माण होऊ शकतो असा अहवाल इलांकाई तमिळ संगम या तामिळ लोकांच्या संघटनेने दिला आहे.या प्रकल्पाच्या प्लांट मधून बाष्पीभवन होताना विषारी अ‍ॅसिड बाहेर पडत असल्याने त्याचा परिणाम या महाबोधी वृक्षावर होऊ शकतो असा दावा या संघटनेने केला आहे.

या लक्षविजया पॉवर प्लांट, ज्याला नोरोचोलाई पॉवर प्लांट म्हणूनही ओळखले जाते. श्रीलंकेतील हा सर्वात मोठा थर्मल पॉवर प्लांट आहे.श्री महाबोधी वृक्ष हे एक पवित्र आणि ऐतिहासिक बोधीवृक्ष (अंजीर वृक्ष) आहे जे श्रीलंकेतील अनुराधापुरा येथे आहे.असे मानले जाते की हे झाड भारतातील गया येथील पवित्र बोधी वृक्षाच्या एका फांदीतून उगवले गेले आहे, याच वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम म्हणजेच भगवान गौतम यांना ज्ञान प्राप्त झाले. स्वतः भगवान बुद्धांशी थेट संबंध असलेल्या या पवित्र वृक्षाला भेट देणार्‍या आणि त्यांना श्रद्धांजली वाहणार्‍या बौद्धांसाठी याचे महत्त्व आहे.

पर्यावरणशास्त्रज्ञांच्या मते, धोकादायक या प्रकल्पातील ऍसिडचे साठे अनुराधापुराच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे, जेथे हा महाबोधी वृक्ष आहे. या प्लांटच्या जवळ असलेल्या वृक्षाची आधीच नुकसानीची लक्षणे दिसू लागली आहेत.या वायूंच्या उत्सर्जनामुळे उंच झाडांची पाने पिवळी पडू लागली आहेत.विषारी उत्सर्जनाचा प्रभाव पवित्र वृक्षावर दिसत आहे.या पॉवर प्लांटमधील मोठ्या प्रमाणात घनकचरा, उष्मा कचरा आणि गरम केलेले पाणी सोडल्यामुळे जल प्रदूषण देखील होते. याचा दीर्घकालीन पर्यावरणावर परिणाम होईल, असा अहवाल या संघटनेने दिला आहे

Scroll to Top