बीजिंग-चिनी संशोधकांनी ऑर्डोसच्या खोऱ्यात युरेनियमचा मोठा साठा शोधला. या युरेनियमच्या साठ्यामुळे हजारो अण्वस्त्रे तयार करता येतील आणि प्रदिर्घ कालावधीपर्यंत ऊर्जेची गरज भागवता येतील, असा अंदाज चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने वर्तवला आहे.
या मंत्रालयाने सांगितले की, युरेनियमचा साठा ऑर्डोस खोऱ्यात जिंगचुआनजवळ सापडला असून हा साठा ३ कोटी टन इतका अतिप्रचंड आहे. चीनमधील ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेल्या युरेनियमचा पुरवठा या साठ्यातून केला जाणार आहे. याबाबत वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग खासगी कंपन्यांच्या भागिदारीत योजना राबवत आहे. चीनमधील ऑर्डोस, यिली, जुंगगर, तारिम, तुहा, एर्लियन, सोंग्लियाओमध्ये युरेनियमचा साठा सापडतो. जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत चीन मधे सर्वात जास्त युरेनियमचा साठा आढळतो.
चीनमध्ये युरेनियमचा मोठा साठा सापडला
