बिजींग – चीनच्या दक्षिण भागातील एका नदीत तेलाची गळती साफ करणाऱ्या एका जहाजाने लहान नौकेले मारलेल्या धडकेत ११ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील ५ जण बेपत्ता आहेत.
चीनच्या हुनान प्रांतातील युआनशुई नदीत तेलाची गळती साफ करणाऱ्या एका जहाजाने प्रवासी नौकेला धडक मारली. त्यानंतर या नौकेतील १९ जण पाण्यात पडले. नदीच्या सर्वाधिक खोल भागात ही दुर्घटना झाल्याने त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. ही नाव नदीतून प्रवास करण्यासाठी वापरली जात होती. या प्रकरणी चीनी पोलिसांनी जहाजावरील तिघांना ताब्यात घेतले आहे. जहाजावरील कोणीही जखमी झाले नाही. या घटनेचा व्हिडीओही सर्वत्र व्हायरल झाला आहे.
चीनमध्ये जहाजाची नौकेला धडक! ११ जणांचा मृत्यू
