बीजिंग – ऑस्ट्रेलियाच्या फेडरल संसदेने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले होते. मात्र यात व्हिडिओ गेमचा समावेश नव्हता. आता चीन सरकारने 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांना व्हिडिओ गेम खेळण्यास निर्बंध घातले आहेत. या मुलांना रोज केवळ एक तास व्हिडिओ गेम खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.
चीनमध्ये व्हिडिओ गेमिंगचे दुष्परिणाम हे मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने गंभीर आहेत. सततच्या गेमिंगमुळे चीनमधील आई-वडील चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे 2019 मध्ये चीनने 18 वर्षांखालील मुलांना सोमवार ते शुक्रवार दरम्यान 90 मिनिटे, तर शनिवारी व रविवारी तीन तासांचा कालावधी दिला होता. त्यानंतर कोरोना काळात रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत व्हिडिओ गेमिंगला बंदी होती.पण आता करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन गेम खेळण्याची वेळ फक्त रात्री 8 ते रात्री 9 पर्यंत अशी मर्यादित करण्यात आली आहे.