बीजिंग :
चीन लवकरच ६जी नेटवर्क लॉन्च करण्याची शक्यता आहे. ६जी वर चीन काम करण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहे. ४ जी नेटवर्कपेक्षा ५ जी नेटवर्क २० पटींनी वेगवान आहे. मात्र ६ जी लॉन्च झाल्यास हे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणारे नेटवर्क असणार आहे. ६जी नेटवर्क पहिल्यांदा कोण सुरु करणार याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढत असताना चीनच्या यशामुळे अमेरिकेला धडकी भरली.
६जी वायरलेस इंटरनेट हे स्पीड, स्पेक्ट्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सुरक्षा आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत आणखी प्रगती करेल अशी अपेक्षा आहे. सध्या अनेक देशांमध्ये ५जी सुरु झाले असले तरी बरेच देश ५ जी नेटवर्कसाठी संघर्ष करत आहेत. यामध्ये चीन देश लवकरच ६ जी वायरलेस नेटवर्क लॉन्च करण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. तसेच चीन अल्ट्रा फास्ट वायरलेस इंटरनेटचे टेस्टिंग देखील करत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्याचा स्पीड १०० जीबीपीएस (गिगाबिट्स प्रति सेकंद) इतका आहे. असे झाल्यास हे नेटवर्क ५जी पेक्षा कितीतरी पटीने वेगवान असणार आहे.
६जी नेटवर्क पहिल्यांदा कोण सुरु करणार याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये आपण मागे राहू की काय अशी भीती अमेरिकेला आहे. गेल्या शुक्रवारी, व्हाईट हाऊसने वायरलेस कनेक्टिव्हिटीच्या पुढील पिढीवर चर्चा करण्यासाठी उद्योग क्षेत्रामधील नेत्यांची भेट घेतली. इतर देश हे ६जी नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या स्टॅंडर्डमध्ये आघाडीवर असतील आणि आपण मागे राहू अशी भीती अमेरिकेला सतावत आहे. मेरिकेला सर्वात जास्त चिंता ही चीनची आहे. थोडक्यात चीनने जर खरोखरच ६ जी नेटवर्क सुरू केले तर अमेरिकेची चिंता वाढणार आहे.