हाँगकाँग – जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था समजल्या जाणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. चीनचा जीडीपी वृद्धी दर जुलै-सप्टेंबर तिमाहीत ४.६ टक्के राहिला आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी दराने झाली असल्याचे सरकारने म्हटले आहे.
मागील तिमाहीतील ४.७ टक्के जीडीपी वृद्धी दराच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत विकासाचा वेग मंदावला आहे. २०२४ च्या सुमारे ५ टक्के दराच्या अधिकृत लक्ष्यापेक्षा तो खूपच कमी आहे.नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने म्हटले आहे की,जागतिक आव्हान आणि गुंतागुंतीच्या देशांतर्गत आर्थिक विकासाच्या पार्श्वभूमीवरही चीनची अर्थव्यवस्था स्थिर होती.सध्या सरकारच्या कर्जाचे प्रमाण ८६ टक्के आहे.चीन सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे.तरीही देशावरील कर्जाचे संकट काही कमी होताना दिसत नाही.