Home / News / चिपळूणमध्ये २९ डिसेंबरला होणार हाफ मॅरेथॉन स्पर्धा

चिपळूणमध्ये २९ डिसेंबरला होणार हाफ मॅरेथॉन स्पर्धा

चिपळूण- शहरातील संघर्ष क्रीडा मंडळाच्यावतीने रविवार २९ डिसेंबर रोजी चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा सकाळी साडेसहा...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

चिपळूण- शहरातील संघर्ष क्रीडा मंडळाच्यावतीने रविवार २९ डिसेंबर रोजी चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु होणार असून कराड रस्त्याने बहादुरशेख पर्यंत जाईल तेथून मुंबई गोवा महामार्गाच्या डाव्या मार्गीकेतून परशुराम स्टॉप पर्यत जाईल.त्याच मार्गावरून परत येऊन पवन तलाव मैदानात बक्षिस वितरण समारंभ होईल.

ही स्पर्धा तीन विभागात घेण्यात येणार असून पुरुष व महिला असे प्रत्येक विभागात पाच गट असणार आहेत.स्पर्धेची थीम ‘धावू प्लास्टिक कचरा मुक्ती असा संदेश या मॅरेथॉन स्पर्धेतून देण्यात येणार आहे अशी माहिती संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम व भाऊ काटदरे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या खुल्या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला विभागा गट असतील. स्पर्धेची थीम ‘धावू प्लास्टिक कचरा मुक्ती साठी’ अशी आहे.प्लास्टिक कचरा निर्मुलन क्षेत्रात मोठे काम करत असलेल्या सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेबरोबर संघर्ष काम करत असून प्लास्टिक कचरा मुक्तीचा संदेश या मॅरेथॉन मधून देशभर पसरवणार आहोत.हाफ मॅरेथॉनसाठी २१.०९७ किलो मीटर,१० किलो मीटर,५ किलो मीटर पर्यंत अंतर असणार आहे.१८ वर्षावरील खुला गट, ३२ ते ४० त्यानंतर ४१ ते ५०,५१ ते ६०, आणि ६० तसेच या १५ ते १७ वर्ष असा विशेष गट असणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या