चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अनारी गावातील ग्रामदेवतेच्या नवीन मंदिराचे उद्घाटन अर्थात जीर्णोद्धार सोहळा उद्या शनिवार १३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने पार पडणार आहे.
तीन दिवस चालणार्या या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्यात वास्तुशांती,धानशयन, होमहवन,कलश मिरवणूक, काकड आरती,देवी मूर्तीची स्थापना,हरिपाठ, कीर्तन आणि गुरूवर्य हभप भारती महाराज यांच्याहस्ते कलशारोहण होणार आहे. महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि माहेरवाशीण यांचा सत्कार, महापूजा व मुख्य उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. गावातील तरुणांनी मर्यादित षटकांच्या अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच देवरुख (पाटगाव) येथील सह्याद्री नमन नाट्य मंडळाचे नमन होणार आहे.