पुणे- पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर काल दरोडा पडला. मध्यरात्री चोरट्यांनी औंध-बाणेर रस्त्यावरील असलेले चितळे बंधू मिठाईवाले दुकानाचे शटर उघडले. दुकानात प्रवेश करून दुकानातील गल्ला फोडून आतील रोख रक्कम लुटली. ही घटना सिसीटीव्हीमध्ये कैद झाली. चोरटे सर्व रक्कम घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. चोरट्यांच्या शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली. चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात रक्कम चोरल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. घरफोडी तसेच दुकानांवर डल्ला मारणे यासह सायबर चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे.