चिकटपट्टीच्या कारखान्यात भीषण आग!१ ठार,३ गंभीर

बेळगाव – चिकटपट्टी बनविणाऱ्या कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल रात्री नऊच्या सुमारास बेळगावातील नावगे क्रॉसवरील औद्योगिक वसाहतीत घडली.या आगीत
एका कामगाराचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झाले.इतर १५६ कामगारांना सुखरुप बाहेर करण्यात आले.ही आग आज सकाळपर्यंत धुमसत होती.

मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी कामगाराचे नांव यल्लाप्पा गुंड्यान्नावर (१९) रा. मार्कंडेयनगर बेळगाव असे आहे.तर गंभीर जखमींची नावे मारुती करवेकर ( ३२), यल्लाप्पा सालगुडे (३५) आणि रणजीत पाटील (३९) अशी आहेत.नावगे क्रॉसवर स्नेहम इंडस्ट्रीज ही चिकटपट्टी बनविण्याची कंपनी आहे.तिथे दिवसा आणि रात्रपाळीतही काम चालते.त्यामुळे नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्रीही काम सुरु होते. नऊच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली.काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आत १६० कामगार कामावर होते.त्यातील १५९ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश आले. मात्र एकाचा या आगीत मृत्यु झाला तर तीनजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top