जकार्ता – इंडोनेशियात बहुतांश दाम्पत्यांना चार-पाच मुले असतात. याबद्दल पोप फ्रान्सिस यांनी इंडोनेशियाच्या नागरिकांचे कौतूक केले.जास्त मुले जन्माला घालण्याची परंपरा अशीच सुरू ठेवा,असा सल्लाही दिला.
तुमच्या देशात बहुतांश दाम्पत्यांना चार ते पाच मुले असतात. हे खरेतर संपूर्ण जगाने अनुकरण करावे असे आदर्श उदाहरण आहे. काही देशांत दाम्पत्यांना स्वतःची मुले असण्यापेक्षा कुत्रा किंवा मांजर पाळावेसे वाटते. तुम्ही मात्र तुमची परंपरा अशीच सुरू ठेवा,असे पोप फ्रान्सिस म्हणाले.
कुटुंबाचा आकार कमी असावा यावर बहुतांश देशांचा कटाक्ष असतो. मात्र पोप फ्रान्सिस चक्क जास्त मुले जन्माला घालण्याचे समर्थन करीत असल्याचे पाहून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांना हसू आवरेना. पोप बोलत असताना विडोडो खो खो हसत होते.