चार दिवसांत बिल भरा अन्यथा वीज कापणार

नवी दिल्ली – येत्या चार दिवसांत विजेचे बिल भरा,अन्यथा वीज कापू, असा इशारा अदानी पॉवरने बांगलादेशला दिला. दरम्यान, कंपनीने बांगलादेशचा वीजपुरवठा अर्ध्यावर आणला आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवर झारखंड लिमिटेड बांगलादेशला विजेचा पुरवठा करते. त्याचे बिल ७,११८ कोटी रुपये झाले. बांगलादेश सरकारने ते भरले नाही. त्यामुळे अदानी पॉवरने बांगलादेशला इशारा दिला आहे.
बांगलादेशच्या पॉवरग्रीडच्या माहितीनुसार, अदानी पॉवरने गुरुवारी रात्रीपासून विजेचा पुरवठा कमी केला आहे. त्यामुळे बांगलादेशला १६०० मेगावॉट वीज कमी पडली. १४९६ मेगावॉटचा बांगलादेशी प्लांट आता ७०० मेगावॉटवर काम करत आहे. अदानी पॉवर लिमिटेड १० एप्रिल २०२३ पासून आपल्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून बांगलादेशला वीज निर्यात करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top