पाटण – तालुक्यातील चाफळ भागात गेल्या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्यांनी भात लागणीला सुरुवात केली आहे. भात लागणीसाठी पैरेकऱ्यांच्या मदतीने चिखलणी केली जात आहे. आतापर्यंत इंद्रायणी आणि मेनका वाणाची विक्रमी भात लागणी केल्याचे दिसून येत आहे.
चाफळ भागातील विरेवाडी, सडा वाघूर या डोंगर पठाराच्या पायथ्याशी असलेल्या नाणेगाव,धायटी,
पाडळोशी या ठिकाणी यंदा नाचणीचे घेतली गेली आहे. तर मुसळेवाडी,नारळवाडी, डेरवण,वागजाईवाडी याठिकाणी मोठ्या प्रमाणात भात लागणी केली आहे.या भागात चिखलणी करत पारंपरिक पध्दतीने भात लागणी केली जाते.यंदा सर्व जातीच्या वाणांचे तरवे चांगली आली आहेत.