पुणे – चाकण शिक्रापूर रोडवर एका कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली कंटेनरने १० जणांना उडवले. यात एकाचा मृत्यू झाला. रस्त्यात येणाऱ्या २० -२५ वाहनांना धडक देत कंटेनर पुढे गेला. चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात या कंटेनरने अनेकांना धडक दिली.याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
सर्वात आधी या कंटेनरने चाकणमधील माणिक चौकात तीन महिलांना उडवले. त्या गंभीर जखमी झाल्या. त्या ठिकाणाहून कंटेनर घेऊन चालकाने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला, हे पाहून त्याने इतर वाहनांना धडक दिली. एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते तेव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले. त्यानंतर शेलपिंपळगाव येथे या कंटेनरने एक मोठा ट्रक व कारला उडवले. यात दुसऱ्या ट्रक खाली कार घुसली. या कंटेनरने चाकण येथे एका मुलीला धडक दिली. त्यात तिचा पाय तुटला. त्यानंतर मोठा जमाव जमा झाला. या जमावाने कंटनेर चालकाला मारहाण केली. कंटेनर चालका यात जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला
चाकण शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरने १० जणांना उडवले! एकाचा मृत्यू
