पुणे
पुण्यातील राजगुरुनगर शहरालगत चांडोली येथे महावितरण कार्यालयात बिबट्या शिरला. अचानक बिबट्या आल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र , कर्मचाऱ्यांनी हुशारीने बिबट्याला कार्यालयात कोंडले. पाच दिवसांपूर्वी बिबट्या मादी बछड्यांसह महावितरण कार्यालयाच्या परिसरात दिसली होती. मात्र आज बिबट्या थेट महावितरण कार्यालयात शिरल्याने कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.