चांदवड एसटी बस अपघातात
महिला कंडक्टर जागीच ठार

चांदवड – आसरखेडाजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. समोरून येणार्‍या वाहनाने कट मारल्यामुळे एसटीचा रॉड तुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी थेट समोरील झाडावर आदळली. या अपघातात 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी असल्याचेही सांगण्यात आले. या जखमींना तडक चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. समोरून येणार्‍या वाहनाने जबर धडक दिल्यामुळे बसचा अक्षरश: चक्काचूर झाला. एसटी बस नांदूरगड येथून मनमाडकडे जाताना हा भीषण अपघात झाला.

Scroll to Top