कॅलिफोर्निया – भारतीय अमेरिकन गायिका व व्यावसायिक चंद्रिका टंडन यांच्या त्रिवेणी या अल्बमला यंदाचा प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्रिवेणी या अल्बममध्ये त्यांनी भारतीय मंत्रोच्चार व जागतिक संगीत याचा सुरेल मेळ साधला आहे.त्रिवेणी या अल्बमला न्यू एज, अँबियंट किंवा चँट म्हणजेच मंत्रोच्चार या श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी सहकारी दक्षिण अफ्रिकेचे बासरीवादक वॉटर केलरमन व जपानी व्हायोलिन वादक एरू मात्सुमोतो यांच्याबरोबर हा पुरस्कार स्विकारला. अहमदाबादमधून व्यवस्थापकीय शिक्षण घेतलेल्या चंद्रिका टंडन या अमेरिकेतील उद्योजिका असून पेप्सिको कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांची मोठी बहिण आहेत. पुरस्कार स्विकारल्यानंतर त्यांनी म्हटले आहे की, या श्रेणीमध्ये आमच्या अल्बमला चांगली नामांकने मिळाली होती. माझ्यासाठी व माझ्यासोबत असलेल्या परदेशी वादकांसाठी हा मोठी आनंदाचा क्षण आहे. या श्रेणीमध्ये रिकी केज यांच्या ब्रेक ऑफ डॉन तसेच अनुष्का शंकर यांच्या चाप्टर दोन, हाऊ डार्क इट इज बिफोर डॉन या अल्बमानांही नामांकने मिळाली होती.
चंद्रिका टंडन ‘त्रिवेणी ‘अल्बमला प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार
