Home / News / चंद्रावर सापडली मोठी गुहा इटालियन शास्त्रज्ञांची माहिती

चंद्रावर सापडली मोठी गुहा इटालियन शास्त्रज्ञांची माहिती

नवी दिल्ली- शास्त्रज्ञांनी चंद्रावर गुहा असल्याचा शोध लावला आहे.अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांनी ५५ वर्षांपूर्वी १९६९ मध्ये...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली- शास्त्रज्ञांनी चंद्रावर गुहा असल्याचा शोध लावला आहे.अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांनी ५५ वर्षांपूर्वी १९६९ मध्ये अपोलो ११ उतरवले होते. याच परिसरात शास्त्रज्ञांना ही १०० मीटर लांबीची गुहा सापडली आहे, ही गुहा अंतराळवीरांना भविष्यात घर म्हणून वापरता येऊ शकेल.

इटलीतील ट्रेंटो युनिव्हर्सिटीचे लोरेन्झो ब्रुझोन आणि लिओनार्डो कॅरर यांनी रडारच्या मदतीने चंद्रावरील ही गुहा शोधून काढली आहे. रडारचा वापर करून त्यांनी चंद्राच्या खडकाळ पृष्ठभागावरील छिद्रातून आत पाहण्याचा प्रयत्न केला. ही गुहा एवढी प्रचंड आकाराची असून ती पृथ्वीवरूनही दिसते.
संशोधकांनी ही महत्वपूर्ण माहिती देताना म्हणाले की ही भविष्यात चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी खूप उपयोगाची ठरणार आहे. त्यांना तिथे राहण्यास, आश्रय घेण्यास ही गुफा फार उपयुक्त ठरेल.

Web Title:
संबंधित बातम्या