ओडिशा
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चंद्रयान – ३ चे प्रक्षेपण जुलैमध्ये करणार आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ही माहिती दिली. भारताच्या एनव्हीएस-०१ उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. त्यानंतर सोमनाथ बोलत होते. जुलैमधील प्रक्षेपणानंतर ऑगस्टला चंद्रयान – ३ चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.
चंद्रयान – २ मोहिम अयशस्वी ठरली होती. सेंसर्स आणि बुस्टर्समध्ये तांत्रिक अडचणी आल्याने लँडरची चंद्राच्या पृष्ठभागावर हार्डलँडिंग झाली होती. चंद्रयान – २ पृष्ठभागापासून सुमारे ३५० मीटर उंचीवरून लँडर वेगाने जमिनीवर आदळले होते. त्या मिशनमधील चुका यावेळी होणार नाहीत, याची काटेकोर काळजी घेतली जात आहे. लँडिंगचे तंत्र सुधारण्यात आले आहे.