चंद्रपूर – बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावरील रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही-आलेवाहीजवळ आज सकाळी एका धडक दिली. त्यात वाघाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.यापूर्वी या रेल्वे मार्गांवर वाघिणीचा बछडा मृतावस्थेत आढळला होता. या रेल्वे मार्गावर आतापर्यंत ५० हून अधिक वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला. यामध्ये वाघ, बिबट्या, हरण, चितळ, अस्वल, रानगवा यासोबतच इतरही प्राण्यांचा समावेश आहे.
चंद्रपुरात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू
