पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील केरी घोटेली येथील बंधार्याच्या खांबांमध्ये लाकडी ओंडके अडकल्याने वाळवंटी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी प्रशासनाने तातडीने ही लाकडे काढण्याची उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाळा सुरू असल्याने घोटेली येथील बंधार्याच्या खांबांमध्ये मोठमोठी लाकडे अडकत आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. आधीच मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. त्यात ही लाकडे अडकल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेची पर्येचे आमदार डॉ.देवीया राणे यांनी गंभीर दखल घेत जलसिंचन खात्याला यासंदर्भात निर्देश दिले आहेत.