Home / News / घाना सेंट्रल बँकेचे सोन्याचे नाणे लॉन्च

घाना सेंट्रल बँकेचे सोन्याचे नाणे लॉन्च

अक्रा – घाना सेंट्रल बँकेने देशांतर्गत बचत वाढण्यासाठी आणि चलनाला बळकट करण्यासाठी नवीन सोन्याचे नाणे लॉन्च केले. हे नाणे ९९.९९...

By: Team Navakal

अक्रा – घाना सेंट्रल बँकेने देशांतर्गत बचत वाढण्यासाठी आणि चलनाला बळकट करण्यासाठी नवीन सोन्याचे नाणे लॉन्च केले. हे नाणे ९९.९९ टक्के शुद्ध सोन्याने बनवले आहे. या नाण्याचे वजन एक, दीड आणि चार औस असल्याचे बँक ऑफ घानाचे गव्हर्नर अर्नेस्ट एडिसन यांनी माध्यमांना सांगितले.

ही नाणी याच महिन्यात गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार आहे, आणि या नाण्याची किंमत लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या लिलावाच्या किंमतीवर आधारित ठरवली जाणार आहे. घानाचे सेडी चलन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. त्यामुळे सेडीला बळकट करण्यासाठी घाना सरकारने वेगवेगळे उपाय करत आहे. त्याच एक भाग म्हणून घानाच्या सेंट्रल बँकेने नवीन नाणे लॉन्च केले.

Web Title:
संबंधित बातम्या