घाटकोपर – घाटकोपरच्या कातोडीपाडा परिसरात काजरोळकर सोसायटीवर दरड कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे नुकसान झाले. कातोडीपाडा येथील काजरोळकर सोसायटी डोंगराळ विभागात आहे. आज दुपारी या ठिकाणी डोंगराचा मोठा भाग खालील घरांवर आला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, घाटकोपर पोलीस, मुंबई मनपाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. तसेच सोसायटीच्या आजूबाजूचा परिसर देखील रिकामा केला. घाटकोपरसह पूर्व उपनगरात अनेक डोंगराळ वस्त्या पावसात भीतीच्या छायेत असतात, या विभागातील स्थानिक नागरिकांनी आता लवकरात लवकर संरक्षक भिंती उभ्या करा, अशी मागणी केली आहे.
घाटकोपरमध्ये दरड कोसळली
