नेवाळी – घणसोली – कल्याण मार्गावर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला आज सकाळच्या सुमारास आग लागली.घणसोली येथून कल्याणच्या दिशेने जाताना बसनेला अचानक पेट घेतला. या आगीची माहिती मिळताच तातडीने वाहतूक पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील दहा प्रवाशांचा जीव वाचला.
कल्याण शिळ रस्त्यावरील घारीवली बस स्टॉपजवळ बसमधून धूर येऊ लागला. लगेच चालकाने बस एका बाजूला घेऊन प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र बस आगीत जळून खाक झाली.