मुंबई – आज विधान भवनात पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ईव्हीएमबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, झारखंड, कर्नाटक, लोकसभा निवडणूक, प्रियंका गांधी यांचा विजय हे सर्व ईव्हीएमवर झाले. तेव्हा त्यांनी विरोध केला नाही.
लाडक्या बहिणींनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली. आम्हाला लोकसभेत 43.55 टक्के मते मिळाली आणि 17 जागा मिळाल्या. मविआला 43.71 टक्के मते मिळाली. पण एकदम 31 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात वेगळे गणित असते. कोर्टात त्यांच्या विरोधात निकाल लागला तेव्हा कोर्टावरही आक्षेप घेतला. त्यांची भूमिका ही लोकशाहीला घातक आहे. माझे त्यांना आवाहन आहे की, हे रडगाणे आता थांबवा. ग्रामपंचायतीला वाटले म्हणून निवडणुका परत घेता येणार नाही. घटना आहे. आयोग आहे. गेले अडीच वर्षे ते फक्त आरोप करीत आहेत. काल त्यांनी शपथ घेतली नाही. आज घेतली. आता रडणे बंद करावे.